श्री वेताळेश्वर शिक्षण संकुलात दांडिया नाईट व गरबा डान्सचे आयोजन

औसा प्रतिनिधी

श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेमध्ये नवरात्र निमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून संस्थेने  महाविद्यालयांमध्ये  दांडिया नाईट व गरबा डान्सचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून  गुजराती महिला मंडळ, लातूर व नृत्यम ८५ डान्स व फिटनेस क्लबचे सचिव व कोरोग्रापर सौ .रोमा शहा हे लाभले यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. व संस्थेचे संचालिका सौ. माधुरी बावगे व प्राचार्या डॉ. श्यामलीला बावगे यांनी प्रमुख पाहुण्याचे शाल बुके व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले, तसेच सोबत संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर बावगे, सचिव श्री वेताळेश्वर  बावगे, कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे ,प्राचार्य श्रीनिवास बुमरेला, डॉ. विरेंद्र मेश्राम संचालक श्री नंदकिशोर बावगे, डॉ. पल्लवी तायडे ,डॉ.श्रद्धा नागमोडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शिवाणी कौळखेरे,  शुभम वैरागकर ,ग्रंथपाल ज्ञानेश्वर कांबळे प्रा.कदम मॅडम  उपस्थित होते. आणि प्रमुख पाहुण्यांनी दांडिया व गरबा डान्सचा आनंद विद्यार्थ्यासोबत घेतले.  तसेच लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, राजीव गांधी पॉलिटेक्निक, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी  लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर कॉलेज ऑफ औद्योगिक प्रशिक्षण ,गुरुनाथ बावगे इंटरनॅशनल स्कूल लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर ,ज्ञानसागर विद्यालय हासेगाव या सर्व युनिटचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. व सर्वांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.

Post a Comment

0 Comments