शासकीय कार्यालयाच्या प्रवेश दारासमोरच घाणीचे साम्राज्य
औसा प्रतिनिधी
औसा येथील गटशिक्षण अधिकारी कार्यालय तसेच एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयासह इतर शासकीय कार्यालय असलेल्या इमारतीच्या ऐन प्रवेशद्वारासमोरच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. औसा येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे गट संधान केंद्र कार्यालय तसेच एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प यांचे कार्यालय असून या कार्यालयाच्या आईन प्रवेशदाराचा दोन्ही बाजूला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात रस्त्यावर भाजी विकणारे तसेच फेरीवाले व इतर छोटे व्यवसायिक घाण कचरा टाकत आहेत. तसेच ग्रामीण भागातून येणारे जाणारे नागरिक या परिसरात उघड्यावर लघुशंका करीत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरली आहे. औसा नगर परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे या परिसरात अत्यंत घाण पसरली असून नगरपालिकेचे या जागेकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. ग्रामीण भागातून येणारे भाजीपाला उत्पादक शेतकरी याच ठिकाणी उघड्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करतात आजूबाजूला घाण पसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. औसा नगर परिषदेने या ठिकाणची घाण त्वरित दूर करावी तसेच या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करून गटशिक्षणाधिकारी कार्यालय व एकात्मिक महिला बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील घाण तातडीने दूर करावी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अशी मागणी होत आहे.
0 Comments