ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा.
औसा (प्रतिनिधी) येथील नबी नगर स्थित ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी शाळेच्या प्रांगणात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म दिन 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्यात आला.15 ऑक्टोबर 2022 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो.ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत देखील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाचन प्रेरणा दिन पार पडला.यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुमनेहा इकबाल शेख यांनी विद्यार्थ्यांना माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील खडतर प्रवासाविषयी माहिती दिली.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील शिक्षिका पठाण तहेनियत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.यावेळी शिक्षिका सय्यद आयेशा,पठाण तरन्नूम,बुशरा पंजेशा व उमर शेख उपस्थित होते.अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments