उत्सव कोजागिरी कार्यक्रमात वेशभूषेसाठी महिलांचा उत्साह
 औसा प्रतिनिधी
 अफसर शेख युवा मंच यांच्या वतीने उत्सव कोजागिरी या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. उत्सव कोजागिरी कार्यक्रमा निमित्त महिलांच्या गरबा दांडिया तसेच विविध वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये महिलांनी अत्यंत उत्साहाने भाग घेऊन फॅन्सी ड्रेस बंजारा ड्रेस तसेच पारंपारिक बोहरीन गुरु गुंडा आणि वैदिन अशा प्रकारच्या विविधरंगी विविध ढंगी वेशभूषा करून प्रसिद्ध प्रेक्षकांची मने जिंकली. 2022 वर्षाच्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अफसर शेख युवा मंचने यावर्षी अनोखा उपक्रम राबवून शहरातील महिलांना पारंपारिक वेशभूषा व फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये सहभागी करून महिलांच्या कलागुणाला वाव दिला  तसेच महिलांना आपल्या उत्कृष्ट कला गुणाचे दर्शन घडविण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले. या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक येणाऱ्या विजेत्यांना माझी लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मेहराज शेख, सौकीर्तीताई कांबळे, गोविंद जाधव, भरत सूर्यवंशी, जावेद शेख, मुजाहिद शेख, अविनाश टिके, कृष्णा सावळकर, अँड वकील इनामदार यांच्यासह अफसर शेख युवा मंचचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments