तपसे चिंचोली येथे ६६वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
औसा प्रतिनिधी;-
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे ६६वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ऑक्टोबर १९५६ रोजी दसऱ्याच्या दिवशी धम्मदीक्षा घेतली होती आज दिनांक 5 ऑक्टोबर २०२२रोजी ६६वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने तपसे चिंचोली येथील तक्षशिला बुद्ध विहारात सर्व प्रथम तथागत गौतम बुद्ध याच्या प्रतिमेला वंदन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर व अन्य महापुरुषाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पंचशील, त्रिशरण,ग्रहण करून ६६वा धमचक्र प्रवर्तन दिन साजरा केला ,या वेळी बौद्ध उपासक,उपाशिका, बालक बालिका यांनी हजेरी लावली होती.
0 Comments