सेवा पंधरवाडा निमित्त आमदार यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली खादी खरेदी
औसा प्रतिनिधी
आजादी का अमृत महोत्सव तसेच राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा या उपक्रमामध्ये आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औसा विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात आले. सेवा पंधरवाडा उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशीचा वापर करण्यासाठी भारतीय नागरिकांनी पुढे यावे म्हणून खादी वस्त्रांची खरेदी करण्याचा उपक्रम आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते औसा येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या खादी भांडार मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोबर रोजी राबविण्यात आला. आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी खादी वस्त्रांची खरेदी केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर राचट्टे, काकासाहेब मोरे, सुनील उटगे, लातूर जिल्हा प्रभारी संतोष आप्पा मुक्ता, नारायण सोळुंके, पंचायत समिती सदस्य दीपक चाबुकस्वार, पप्पू भाई शेख, शिवरुद्र मुर्गे, जगदीश सिंह परदेशी, भीमाशंकर मिटकरी, धनंजय परसणे, राम कांबळे, सोनाली गुलबिले, संतोष चिकुर्डे कर, शहराध्यक्ष लहू कांबळे, कंटापा मुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व खादी भांडारचे व्यवस्थापक राजकुमार गाडेकर उपस्थित होते.
0 Comments