हासेगाव फार्मसी त पदवी प्रधान कार्यक्रम समारंभ .
औसा (प्रतिनिधी )
विध्यार्थ्यानी पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञानाकडे हि लक्ष द्यावे एक चांगला नागरिक बनून सामाजिक बांधिलकी निर्माण करा. पुढे म्हणाले जीवनात कोणतेही कार्य करा पण आपल्या आई वडिलांना जोपासा ,तुम्ही तुमच्या कुठुंबाची जबाबदारी घेतलात तर एका समाजाची जबाबदारी होईल आणि समाजाची म्हणजेच देशाची जबाबदारी होईल असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ दिगांबर नेटके यांनी श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलीत लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयात पदवी प्रधान समारंभ कार्यक्रम बोलत होते .
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ दिगांबर नेटके,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापक समितीचे माजी सदस्य डॉ रमाकांत घाडगे , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सिनेट मेंबर डॉ अशोक मोठे , संस्था अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे , कोशाध्यक्ष शिवलिंग जेवळे , प्राचार्य डॉ श्यामलीला बावगे ( जेवळे) , लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर चे प्राचार्य डॉ श्रीनिवास भूमरेला , डॉ नितीन लोणीकर इत्यादी मंचावर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर भाषण संस्था कोशाध्यक्ष शिवलिंग जेवळे यांनी केले तर सविस्तर मार्गदर्शन डॉ रमाकांत घाडगे केले .बी फार्मसी आणि एम फार्मसी विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रधान करून सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी , लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वाकडे एस. यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ श्यामलीला बावगे ( जेवळे) यांनी केले.
0 Comments