सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल अजयकुमार बोराडे पाटील यांचा गौरव
लातूर प्रतिनिधी 
युवराज छत्रपती संभाजीराजे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

लातूर : सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल नेटिझन्स मीडियाचे संचालक अजयकुमार बोराडे पाटील यांचा शिक्षक प्रतिनिधी (शिक्षक काँग्रेस) सभेद्वारे युवराज छत्रपती संभाजीराजे, माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते पुरस्काराने गौरव करण्यात आला.

यावेळी आ. विक्रम काळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा आ. धीरज देशमुख, रीड लातूर उपक्रमाच्या प्रनेत्या दिपशिखा देशमुख, कालिदास माने, शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशव गंभिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अजयकुमार बोराडे पाटील गेल्या १० वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, गरजू, होतकरू मुला-मुलींनी शैक्षणिक बाबींसाठी ते सदैव मदत करतात. मराठा क्रांती मोर्चातही त्यांनी महत्वाची भूमिका साकारत समाजाला सर्वोतोपरी सहकार्य केले. 

विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे त्यांनी लातूरचे नाव राज्यस्तरावर पोहचविले असून, लोकनेते विलासराव देशमुख फोटो आणि विडिओ बोराडे पाटील यांनी संग्रहित करून कार्यकर्त्यांसाठी संग्रह रेना साखर कारखाना साहेबच संग्रहालय  मध्येही त्यांनी केलेले संग्रह पाहण्यासाठी  आहे.स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या लाखो छायाचित्राचे संग्रह करून प्रत्येकाच्या मनामनात साहेबांना जिवंत ठेवण्याचे काम आणि साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम त्यांनी केले आहे अजून एक छंद म्हणजे शिवकालीन नाणी जुनी नाणी नवीन नोटा परदेशी परकीय चलन प्रत्येक देशाचे एक तरी नोट
यांचा सुंदर संग्रहामध्ये पाहावयास मिळतो ...यशस्वी युवा उद्योजक लातूर जिल्ह्यातच नवे तर पूर्ण महाराष्ट्रभरात होर्डिंग्ज  व्यवसायात प्रसिद्ध असलेले  नेटिजन्स मीडिया  सर्व्हिसेस चे सर्वसर्वे 
अजयकुमार_प्रकाशराव_बोराडे_पाटील त्यांच्या याच कार्याची दखल घेत शिक्षक काँग्रेसच्या वतीने त्यांचा विकासमहर्षी विलासराव देशमुख ज्ञानरत्न सामाजिक चळवळ कार्यात सक्रिय सहभाग पुरस्कार देऊन दयानंद सभागृहात गौरव करण्यात आला. आगामी काळात सर्वच घटकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे अजयकुमार बोराडे पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. पुरस्कार मिळाल्याबद्दल बोराडे पाटील यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments