पायी जाणाऱ्या देवी भक्ता कडून आई तुळजाभवानी अन्नछत्र मंडळाचे कौतुक
औसा प्रतिनिधी
पावसाळा येथील श्री आई तुळजाभवानी आणि छत्र मंडळाच्या वतीने कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या देवी भक्तासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा देण्यात येत आहे. भक्तांना विश्रांतीसाठी निवारा, चहा, नाश्ता व फराळाचे साहित्य तसेच भोजन इत्यादी सुविधांसह शुद्ध पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. श्री आई तुळजाभवानी अन्नछत्र मंडळांनी मागील नऊ वर्षापासून पायी चालत जाणाऱ्या देवी भक्तासाठी हा उपक्रम सुरू ठेवला असेल या उपक्रमात मध्ये भक्तांना अत्यंत विनम्र सेवा देण्यात येत आहे. त्याबद्दल देवी भक्ताकडून अन्नछत्र मंडळाच्या कार्याचे कौतुक होत आहे. मंडळाचे संस्थापक गिरीश ईळेकर, विजयकुमार कुंभार, मोरेश्वर नाईक, प्रवीण मिटकरी, बाळासाहेब सोनवळकर, निशांत राचट्टे, अक्षय मिटकरी, केदार कारंजे, अभिजीत जयशेट्टे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी या उपक्रमात परिश्रम घेत असून 26 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या अन्नछत्र मंडळाची चार ऑक्टोबर रोजी सांगता होणार असल्याची माहिती संस्थापक यांनी दिली आहे.
0 Comments