बळी काशिनाथ पवार यांची शिवसेनेच्या तालुका उपप्रमुख पदी निवड

औसा/ प्रतिनिधी
 औसा तालुक्यातील एक उपक्रमशील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते बळी काशिनाथ पवार यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या तालुका उपप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख ज्येष्ठविधीज्ञ बळवंत भाऊ जाधव, विधीज्ञ तथा उपजिल्हाप्रमुख रोहित भाऊ गोमदे पाटील, औसा तालुका प्रमुख गणेश भाऊ माडजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते तथा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नवनाथ भाऊ भोसले, जगन चव्हाण, ज्ञानेश्वर हंताळे, समाधान लोखंडे, निलेश माडजे, सतीश कटके, उमाकांत यादव इत्यादी उपस्थित होते.
 लातूर येथील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच बाळासाहेबांना अपेक्षित असलेले हिंदुत्ववादी विचार समाजामध्ये रुजऊन शिवसेनेचा विचार घराघरात पोहोचता कराल, अशी अपेक्षा जिल्हा प्रमुखांनी व्यक्त केली आहे.
संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेता बळी पवार यांचा दांडगा जनसंपर्क आणि संघटन कुशलता निश्चितपणे पक्ष संघटनेला फायद्याचा ठरणार आहे. या निवडीबद्दल बोलताना बळी पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की, पक्षश्रेष्ठींनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे, त्याचे भान आणि जाण ठेवून मी काम करेन. सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची उकल व्हावी, म्हणून मी सदैव अग्रेसिव राहीन, मी माझ्या कार्यातून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची प्रतिष्ठा वाढेल असेच काम करेन, असा विश्वास व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments