गोपालकांना गीर गाईचा व्यवसाय म्हणून मोठा आधार 
औसा प्रतिनिधी
 संस्कृती प्रधान भारत देशामध्ये गाईला गोमाता असे म्हटले जाते. गोवंशाची जोपासना करण्यासाठी केंद्र सरकारनेही मोठी योजना आखली आहे‌. तसेच गोंवशहत्या बंदीचा कायदा ही करण्यात आला आहे. गाईमध्ये विविध जातीच्या गायी असल्या तरी गिर जातीच्या गाई ह्या अत्यंत उपयुक्त असून गीर गाईचे संगोपन हे गोपालकांना व्यवसाय म्हणून मोठा आधार आहे. श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात राजस्थान येथून अनेक गोपालकांनी गीर गाईचे संगोपन करण्यासाठी हा परिसर निवडला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या श्री विठ्ठल साई साखर कारखाना परिसरामध्ये सुमारे 200 गीर जातीच्या गाई राजस्थान मधील गोपालक व्यवसाय म्हणून या ठिकाणी मागील दोन वर्षापासून संगोपन करीत आहेत. गाईचे दूध, तूप, गोमूत्र, शेण आणि गोवरीची  राख हे पंचगव्य म्हणून अनेक रोगावर बहुगुणी औषध म्हणून वापरण्यात येते. त्यासाठी अनेक ठिकाणी गोशाळेच्या माध्यमातून विविध रोगावर औषधे तयार करण्यासाठी हे सर्व पंचगव्य साहित्य पुरविण्यात येते. मुरूम येथील साखर कारखान्याच्या परिसरात सुमारे 200 गीर जातीच्या एकाच तांबड्या रंगाच्या गाई व वासरे या ठिकाणी संगोपन केली जातात. गिर जातीच्या गाईपासून राजस्थानमधील गोपालक व्यवसायिकांना आर्थिक लाभ होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच गोमातेचे संगोपन करत करीत आमच्या कुटुंबाला आर्थिक आधार ही मिळत असल्याचे गोपालकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

Post a Comment

0 Comments