जुन्या शासकीय आदेशांचे मराठीत भाषांतर केल्या बद्दल डॉ खलील सिद्दीकी यांना प्रशस्तीपत्र...

औसा..
200 वर्षे जुन्या  निजाम कालीन  उर्दू व फारसी भाषेतील एक हजारहून जास्त शासकीय आदेशांचे मराठी भाषेत यशस्वीरित्या भाषांतर केल्या बद्दल 
अजीम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज औसा येथील पर्यवेक्षक डॉ. प्रा. एम खलीलोद्दीन सिद्दीकी यांना जिल्हाधिकारी श्री बी. पी पृथ्वीवीराज यांच्या कडून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे..
अभीलेख कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यंत दुर्मिळ व महत्त्वाचे असे सरकारे आसिफीया अर्थात निजाम कालीन शासकीय आदेश ज्याला 'मुंतखब' असे नाव आहे.. त्या अतिशय महत्त्वाचे शासकीय आदेश सद्या सहसा पुर्ण कोणालाही वाचता येत नाही याची लिपी फार जुनी सून ही लिखाणाची शैली सुद्धा अस्तित्वात नाही.. तरी सुद्धा डॉ खलील सिद्दीकी यांनी भाषांतरासाठी लावण्यात आलेल्या विशेष कॅंप मध्ये सर्वांचे नेतृत्व करीत  यशस्वीरित्या उत्कृष्ट भाषांतर केले आहे..विशेष म्हणजे डॉ सिद्दीकी यांचे शिक्षण हैदराबाद येथे झाले असून ते उर्दू भाषेचे गाढे अभ्यासक आहेत.. 
डॉ खलील सिद्दीकी हे पानगाव ता रेणापूर येथील रहिवासी असून त्यांची आजतागायत 22 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.. व त्याना एक राष्ट्रीय व तीन राज्यस्तरीय शासकीय पुरस्कार मिळाले आहेत.. उत्कृष्ट लेखक व उर्दू कवी म्हणून डॉ खलील सिद्दीकी यांची ओळख आहे.. उर्दू पञकारितेत ही त्यांचे विशेष योगदान असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकांचे त्यांनी संपादन केले आहे..
मा. जिल्हाधिकारी यांनी डॉ खलील सिद्दीकी यांची दखल घेऊन त्यांना प्रशस्तीपत्र दिल्या बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे..

Post a Comment

0 Comments