माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस " वाचन प्रेरणा दिन "*

*म्हणून जिल्हात विविध उपक्रमांनी होणार साजरा*

*लातूर,दि.4(जिमाका)* माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा जन्म दिवस " वाचन प्रेरणा दिन " म्हणून जिल्हात विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. त्यात व्याख्यान, ग्रंथ प्रदर्शन, वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी मराठी भाषेची जागरूकता निर्माण करण्यासाठी शिक्षण संस्था, इतर सामाजिक संस्थांनी "मराठी वाचन कट्टा " निर्माण करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांच्याकडून प्रयत्न व्हावेत अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या.

          लातूर जिल्ह्यात " वाचन प्रेरणा दिन " पूर्वतयारीसाठी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला या समितीचे सदस्य म्हणून अपर पोलीस अधिक्षक अनुराग जैन, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक,मराठवाडा साहित्य परिषदेचे लातूर शाखेचे अध्यक्ष प्रा. जयद्रथ जाधव,जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे उपस्थित होते.

            विकीपिडीयासारख्या माध्यमावर मराठीत जास्तीत-जास्त लेखन व्हावे याकरिता यासंबंधीच्या कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात व जागृती करावी. मराठी अभिजात दर्जाबाबत सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे. तसेच वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी मराठी भाषेच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता संबंधित कार्यालयांनी संकेतस्थळे, आकाशवाणी, दूरदर्शन, खाजगी दूरचित्रवाहिन्या, एफ.एम.रेडिओ, स्थानिक केबल नेटवर्क, फेसबुक, व्टिटर, व्हॉट्सॲप इत्यादी प्रसार माध्यमातून दृक-श्राव्य संदेश प्रसारित करावेत, अशा सुचनाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी दिल्या.

                                                                                

Post a Comment

0 Comments