पं. शिवरुद्र स्वामी यांच्या भैरविणे ' संगीत दरबार ' ची सांगता
औसा प्रतिनिधी
दि. 31 / 10 2022
औसा येथील श्री मुक्तेश्वर मंदिरात रविवारी संगीत दरबार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हर्षवर्धन कोपरे व मानव माळी या बाल कलाकारांनी तबला जुगलबंदी उत्कृष्ट पणे सादर केली . स्वप्नाली बसर्गी, मुक्ता जाधव, प्रीती मोहिते, अवधूत कुंभार, रितेश कदम, चैतन्य मुसाडे या बाल कलाकारांबरोबर नरशिंग राजे, अजय सारोलकर, हणमंत लोकरे, मन्मथ कुदळे, अविनाश यादव, सुनील चेलकर, शिवानंद वैरागकर, विश्वनाथ धुमाळ, राजाभाऊ जंगाले, स्वेता तंत्रे पाटील या कलाकारांचे गायन, वादन आणि स्वेता पाटील व त्यांच्या शिष्यांनी कथ्थक तर अक्षय कुलकर्णी यांनी तबला सोलो सादरीकरण केले.
माऊली संगीत विद्यालयाचे संचालक पं. शिवरुद्र स्वामी यांनी इवलेसे रोप लावीयले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी या भैरविणे कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी चैतन्य पांचाळ, दिनेश पोखरकर, अक्षय पांचाळ, पांडुरंग केसरकर,अनिल यादव यांनी हार्मोनियम व तबला साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी अप्पा राचटे, वेंकट पन्हाळे, धनंजय कोपरे, गजभार, खंडू क्षीरसागर यांनी श्रम घेतले.
0 Comments