देशसेवेसाठी कार्यरत असणारे जवान सुभेदार धंनंजय सुभाषराव पाटील यांचा देशसेवा निवृत्त समारंभ सोहळा संपन्न..
निलंगा 
मौजे कोराळी, ता.निलंगा जि. लातूर येथे दि.11-10-2022 या रोजी देशसेवेसाठी कार्यरत असणारे जवान सुभेदार धनंजयजी सुभाषराव पाटील यांच्या देशसेवा निवृत्त समारंभ सोहळ्सास धाराशिव लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमराजे दादा निंबाळकर व संतोष भाऊ सोमवंशी उपसभापती महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे. यांनी यासंदर्भात देश सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या अशा बहाद्दुर योध्याबद्दल मला खरंच अभिमान वाटतो, कारण या देशाचे शूरवीर जवान अहोरात्र आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत असतात. आणि या देशांच्या जडणघडणीमध्ये अशा अनेक जवानांचा फार मोलाचा वाटा आहे. असे मत सोमवंशी यांनी मांडले. आणि सुभेदारांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
व तसेच कोराळी गावातील गुणवंत व किर्तीवंत विद्यार्थ्यांचा सत्कार याप्रसंगी माननीय खासदार ओमदादा राजे निंबाळकर व संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने, *माजी कृषी सभापती श्री.बजरंग दादा जाधव, *युवासेना जिल्हा प्रमुख दिनेश जावळे, औसा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती श्री.किशोर जाधव, शिवसेना उप-तालुका प्रमुख किशोर भोसले, अनिल आरीकर, महेशदादा सगर व यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments