*भाजपात नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांना सन्मान दिला जाईल-आ. रमेशआप्पा कराड*
       काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात घराणेशाही चालते भाजपात कोणीही प्रस्थापित नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे औसा विधानसभा मतदारसंघातील अनेकांनी भाजपात प्रवेश केला त्या सर्वांना मान सन्मान दिला जाईल क्षमतेनुसार जबाबदारी आणि न्याय देण्याची कामे करू असे सांगून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी भाजपात नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे मनापासून स्वागत केले.
            औसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या ओबीसी सेलचे मराठवाडा अध्यक्ष प्रा सुधीर पोद्दार, ठाकरे सेनेचे प्रवीण कोपरकर यांच्यासह अनेक गावचे सरपंच, चेअरमन विविध पक्षातील प्रमुखांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे परवा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला या सर्वांचा परिचय व्हावा यासाठी आयोजित भाजपाच्या संवाद कार्यालयात कार्यक्रम झाला या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड औसा मतदारसंघाचे आ अभिमन्यू पवार, जिल्हा प्रभारी संतोषआप्पा मुक्ता, औसा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
           देशाचे विकासपुरुष कर्तुत्वान नेतृत्व मा नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात काम करायला मिळते हे आपले सर्वांचे भाग्य असून येणारा वीस पंचवीस वर्षाचा काळ हा भाजपाचा राहणार आहे काँग्रेसचा पुनर्जन्म होणार नाही असे सांगून आ रमेशआप्पा कराड म्हणाले की, आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या काळात एकत्रितपणे काम करून भाजपाची ताकद वाढवू या.
         लातूर जिल्ह्याला कणखर आणि बाणेदार जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांच्या रूपाने लाभला असून त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात भाजपाची संघटनात्मक ताकद मजबूत झाली आहे आज लातूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगून आ अभिमन्यू पवार यांनी भाजपात नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे मनःपूर्वक हृदयपूर्वक स्वागत केले.
          यावेळी जिल्हा प्रभारी संतोषआप्पा मुक्ता, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, भाजपात नव्याने प्रवेश केलेले प्रा सुधीर पोद्दार, प्रवीण कोपरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी भाजपाचे सुनील उटगे, काकासाहेब मोरे, राजकिरण साठे यांच्यासह अनेक पदाधिकारी लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीत नव्याने प्रवेश केलेले अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments