आझादी का अमृत महोत्सव करीता लावलेले राष्ट्रध्वज  न काढणा-यांवर कार्यवाही करा:
सय्यद मुजफ्फर अली इनामदार 
औसा प्रतिनिधी 
 आझादी का अमृत महोत्सव करीता लावलेले राष्ट्रध्वज आजतागायत न काढणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी एमआयएम च्या वतीने औसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.त्याचे सविस्तर वृत्त असे  आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत सर्वांना १३ ते १५ ऑगष्ट दरम्यान राष्ट्रध्वज लावण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार नागरीकांना सदर वेळेत राष्ट्रध्वज लावून अमृत महोत्सव साजरा केला आहे.

परंतु काही लोकांनी दिड ते दोन महिन्याचा कालावधीत होऊनही राष्ट्रध्वज काढलेले नाहीत, त्यामुळे ते उन वारा पाऊस यामुळे जिर्ण होऊन राष्ट्रध्वजाची अवमानना होत आहे. ही गांभीर्यपूर्वक आहे. यासाठी आपले कार्यालय जबाबदार आहे.

तरी संबंधीत मौलाना अबुल कलाम आझाद चौक व इतर ठिकाणी असलेले राष्ट्रध्वज त्वरीत काढण्यात येऊन त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.या मागणीसाठी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा तहसीलदार यांना 3 अॉक्टोंबर सोमवार रोजी निवेदन देण्यात आले.या निवेदनावर एमआयएम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments