औशात संभाजी ब्रिगेड कार्यालयाचे उद्घाटन आणि पदनियुक्ती सोहळा उत्साहात संपन्न
औसा प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक उमाकांत उफाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष लातुर पश्चिम रामहरी भिसे यांच्या अध्यक्षतेखाली औसा शहराध्यक्ष महेबुब इमामसाब खडकाळे यांच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन याकतपूर रोड कसबे हॉस्पिटल शेजारी येथे धुमधडाक्यात करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी संभाजी ब्रिगेड चे जिल्हा सचिव रफिक शेख, उपाध्यक्ष नरसिंह पवार, तालुकाध्यक्ष बाळकृष्ण कदम उजनीकर, विधानसभा अध्यक्ष संजय बाभळसुरे, कार्याध्यक्ष दयानंद गोरे, संतोष गायकवाड,शाम भोळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तर कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष,किल्लारी, उजनी सर्कल प्रमुखासहित अनेक नवीन पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना विविध पदाच्या जबाबदारी नियुक्ती पत्र आणि गृंथभेट देऊन शिवसत्कार करण्यात आला.यावेळी संभाजी ब्रिगेड औसा पुढील सर्व निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार सर्वानूमते घेण्यात आला. सर्व संभाजी ब्रिगेड लातुर पश्चिम/औसा तालुका शहर टिमच्या वतीने सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments