भारत स्वाभिमान पतंजली योग समिती औसाच्या तालुकाध्यक्षपदी श्री नेताजी सावंत यांची नियुक्ती.. 
औसा प्रतिनिधी 
दि.09/10/2022 रोजी भारत स्वाभिमान पतंजली योग समिती राज्य उपाध्यक्ष मा. श्री अनिल अमृतवारजी , जिल्हाध्यक्ष मा. श्री. रामजी घाडगे , जिल्हाकोषाध्यक्ष प्राचार्य मा. श्री. राजाभाऊ खंदाडे व अन्य मान्यवर मंडळीच्या उपस्थित मुक्तेश्वर माध्य. विद्यालयात बैठक आयोजित करून भारत स्वाभीमान पतंजली योग  समिती स्थापन करण्यात आली .तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आले. त्यात 1)तहसील प्रभारी (तालुकाध्यक्ष) पदी - योगगुरु मा. श्री नेताजी सावंत यांची  नियुक्ती करण्यात आली.  2)उपाध्यक्ष - शिराळ सिध्देश्वर , 
3) महामंत्री - आकाश प्रकाश पाटील
4 )संघटनमंत्री - बाबुराव साळूंके , 
5)सहसंघटनमंत्री - अजित ढोले , 
6)कोषाध्यक्ष - मा.श्री गोविंद जगताप , तर 
7)तालुका मिडीया प्रभारी पदी रामभाऊ कांबळे यांची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.या सर्व नविन कार्यकारीणीचा शाल श्रीफळ पुष्पहाराने सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून रुपेश कारंजे हे उपस्थित होते. तसेच मोठ्या प्रमाणात योगप्रेमी स्त्री - पुरुष उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments