घाण पाण्यामुळे
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
औसा प्रतिनिधी 
औसा-तालुक्यातील भादा हे गाव लोकसंख्येने मोठे असून हे गाव १९९३ च्या भूकंपानंतर विविध वस्त्यांमध्ये विस्तीर्णपणे पाच ठिकाणी वसले आहे.
यामुळे या गावाचा संपूर्ण आलेखच बदलून गेला आणि नागरिक ही मोठे बेजबाबदारपणे वागू लागले? अशी अवस्था सध्या औसा तालुक्यातील भादा या गावची झालेली आहे.
सध्या हे गाव विविध समस्यांनी ग्रासलेले आहे.या समस्या खुद्द नागरिकच निर्माण करीत आहेत आणि या समस्या बाबत ग्रामपंचायत ठोस निर्णय न घेतल्यामुळे या समस्यांमध्ये दिवसे  दिवस वाढ होत आहे.
नागरिकांना रहदारी आणि ये जा करण्यासाठी सोडण्यात आलेले रस्ते आणि बनविलेल्या गटारी या गटारी काही जबाबदार नागरिकांनी मुरूम दगड टाकून बुजविल्या असून यामुळेच त्याचे पाणी रस्त्यावर सोडले आहे आणि गटारीवर सर्रास गावांमध्ये अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे.
यामुळे गटारीने जाणारे पाणी रस्त्यावर येत आहे यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना आणि विद्यार्थी ज्येष्ठ नागरीक या सर्वांना रस्त्याने चालणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे.
याकरिता गटारीच्या या गहान पाण्यातूनच मार्ग काढत सर्वांना पुढे जावे लागते.यामुळे या घाण पाण्यातून गेल्यामुळे आणि पाणी रस्त्यावरती थांबल्यामुळे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात डास निर्मिती होऊन नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.
 अशी परिस्थिती गावातील प्रत्येक गल्लीमध्ये निर्माण झाली आहे यामुळे सर्व गटारी मोकळ्या करून पाणी सुनियोजित पुढे कसे प्रवाहीत होऊन जाईल याबाबत ठोस निर्णय घेणे हे ग्रामपंचायतीचे आद्य कर्तव्य आहे. याकरिता ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी गावातील नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

(      )सध्या भादा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड ही बिहार पॅटर्न अंतर्गत सुरू आहे या वृक्ष लागवडीकडेच ग्रामपंचायतचे लक्ष असल्याने येत्या पंधरा दिवसांमध्ये हे काम पूर्ण होऊन गावातील गटारी आणि रस्ते स्वच्छ करण्याकरिता ग्रामपंचायत पूर्णपणे लक्ष देईल असे यावेळी उपसरपंच बालाजी शिंदे उर्फ बी एम आणि ग्रामविकास अधिकारी माणिक व्ही सूर्यवंशी यांनी सदरील प्रतिनिधीशी बोलताना त्यांचा मानस व्यक्त केला आहे..

Post a Comment

0 Comments