औसा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार यांचा सत्कार संपन्न
औसा प्रतिनिधी :- शेत रस्त्याचे जनक आणि शेतकऱ्यांना गोगलगायीच्या संकट काळातून बाहेर काढून भरीव मदत मिळवून देणारे औसा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा करून भरघोस आर्थिक मदत मिळवून दिली तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रोत्साहन पर अनुदानाचा प्रश्न प्रलंबित होता. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याबद्दल औसा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मोरे कॉम्प्लेक्स तुळजापूर मोड औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांचा सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुनील उटगे, हिमायत पटेल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मध्यंतरीच्या काळात सतत धार पावसामुळे शेतकऱ्याच्या खरीप शेती पिकाचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला होता, सतत धार पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे अशाही शेतकऱ्यांना नियमात बसवून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला तसेच राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना औसा तालुक्यामध्ये आणून शेतकऱ्यांच्या सोयाबीन उडीद मूग पिकाच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती करून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी मोलाचे कार्य केल्याबद्दल मतदारसंघातील शेतकऱ्यांनी औसा येथे भव्य सत्कार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी तसेच. यावेळी औसा शहरासह ग्रामीण भागातील शेकडो शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड श्रीधर जाधव यांनी केले.
0 Comments