किल्ला परिसर स्वच्छता करा:सौ. किर्ती ताई कांबळे
औसा प्रतिनिधी
औसा येथील किल्ला परिसरात स्वच्छता करा.या मागणीसाठी माजी नगराध्यक्षा सौ किर्ती ताई कांबळे यांनी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे,कोव्हीड काळात दोन ते तीन वर्षांपासून किल्ला बंद असल्यामुळे गवत व झाडे सर्वत्र अस्तव्यस्त वाढलेली दिसत आहेत.यामुळे आलेल्या पर्यटकांना तिथे वावरतांना अडचण येत येते.आता दिपवालीच्या सुट्या येत आहेत.तेव्हा पर्यटकांच्या सुविधेसाठी स्वच्छता होणे गरजेचे आहे. पर्यटक बाहेरून येत असतात, याठिकाणी आल्यावर त्यांना ब-याच अडचणीचा सामना करावा लागत आहे.याठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
तसेच स्वच्छतागृहासाठी बरेच लोक मागणी करत आहेत.काही ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेराही लावावा लागेल.अशी मागणी या निवेदनाद्वारे माजी नगराध्यक्षा सौ. किर्ती ताई कांबळे यांनी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना 20 ऑक्टोबर गुरुवार रोजी निवेदन सादर केले आहे.
0 Comments