राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औसा शहरच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील सर्व जलकुंभ सुरक्षित करावे,
औशातील नागरिकांना रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी लावलेले जाचक अटी रद्द करावे.
अफसर शेख युवा मंच नगरपरिषद औसा यांच्यामार्फत पाडण्यात आलेले बोअरवेल कनेक्शन देण्यासह सिमेंट टाक्या बसवून त्या त्या भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावेत अशा विविध मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हा ग्रामीण चे कार्याध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या सूचनेनुसार व माजी नगराध्यक्ष मेहराज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 20 ऑक्टोबर गुरुवार रोजी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औसा शहरच्या वतीने निवेदन देण्यात आले.त्या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे,औसा शहरातील सर्व जलकुंभ सदस्थितीत असंरक्षित असून या परिसरात झाडे झुडपे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत.सदरील जलकुंभाजवळ संरक्षित गेट नसल्यामुळें त्या ठिकाणी नागरिक मूत्र विसर्जन करतात, त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.तसेच शहरास पुरवठा होणारे पाणी दुषीत होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच जलकुंभावर चढण्यापासून मज्जाव करण्यासाठी सदरील ठिकाणी पालिकेचा कोणताच कर्मचारी उपलब्ध नसतो.जलकुंभावर चढून आंदोलन करण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत तसेच भविष्यातही घडण्याची शक्यता आहे.याठिकाणी सदरील भिंत व गेट बांधणे आवश्यक आहे.
नागरिकांना आधार कार्ड,बॅक कामाकरिता तहसिल कार्यालयात तसेच इतर शासकीय कामासाठी नगरपरिषदेच्या रहिवाशी प्रमाणपत्राची आवश्यकता असते.असे असतांना आपल्या कार्यालयातून रहिवाशी प्रमाणपत्र देण्यासाठी नळ पट्टी,व घरपट्टी व वसूली अधिकारांचा रिपोर्ट यासारखे जाचक अटी लावण्यात आलेल्या आहेत.सदर अटी रद्द करुन पूर्वीप्रमाणे आधार कार्डवर रहिवाशी प्रमाणपत्र देण्यात यावेत.
अफसर शेख युवा मंच व नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी बोअरवेल घेण्यात आलेले आहेत.सदरील बोअर लवकरात लवकर चालू करण्यात यावेत व सिमेंट टाक्या लावून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा.तसेच शहरातील नादुरुस्त असलेले बोअरवेल पूर्ववत चालू करण्यात यावेत.अन्यथा वरील रास्त मागण्या त्वरित मान्य नाही झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस औसा शहरच्या वतीने नगरपरिषदेच्या समोर ठिय्या व धरणे आंदोलन करण्यात येईल याची पालिका प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी.अशा विविध मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पाणी पुरवठा सभापती गोंवीद जाधव,माजी नगराध्यक्ष मेहराज शेख, अँड शिवाजी सावंत, अँड संतोष औटी, अँड सय्यद मुस्तफा इनामदार, अविनाश टिके,उमर पंजेशा , संगमेश्वर उटगे आदि उपस्थित होते.
0 Comments