गौतम बुद्धांनी मानव जातीला दुःख मुक्त करून कल्याणचा मार्ग दाखवला: प्रा बापूसाहेब गायकवाड 
औसा प्रतिनिधी
 तथागत गौतम बुद्धांनी राजवैभवाचा त्याग करून खऱ्या सुखाचा शोध घेण्यासाठी बोधी वृक्षा खाली चिंतन केलेआणि त्यांना दिगज्ञानाची प्राप्ती झाली. सकल मानव जातीला दुःखातून मुक्त करून मानव कल्याणाचा मार्ग तथागत गौतम बुद्धांनी दाखविला असे प्रतिपादन अखिल भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रा बापूसाहेब गायकवाड यांनी केले. रविवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी भीम नगर औसा येथे वर्षावास कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यास पिठावर भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका दैवशाला गायकवाड, हिराचंद गायकवाड, समता सैनिक दलाचे मेजर शिंदे, रोहित बनसोडे, अध्यक्ष उद्धव लोंढे, रावसाहेब सूर्यवंशी, सत्यभामा रोंगे, अनिल कांबळे, रंजना हावळे, समता सैनिक दलाचे शहराध्यक्ष धम्मदीप डांगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. बापू गायकवाड म्हणाले महात्मा गौतम बुद्धाने सारनाथ येथे फक्त पाच बौद्ध भिकू समोर पहिले प्रवचन दिव्यज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर केली. भिकू संघाची स्थापना करून नंतर देश विदेशामध्ये बौद्ध भिकू ने आपल्या वतीने धम्मप्रसाराचे कार्य सुरू केले. पावसाळ्यामध्ये हे काम करत असताना बौद्ध भिक्खूंना अनेक नैसर्गिक संकटाला तोंड द्यावे लागत होते, म्हणून त्यांनी वर्षावास कार्यक्रमाची स्थापना केली. वर्षावास च्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये चार महिने बौद्ध भिकूंनी बौद्ध विहार किंवा सामाजिक सभागृहामध्ये राहून धम्म कार्य करावे अशी परवानगी दिल्याने आज केंद्रीय शिक्षकांच्या माध्यमातून धम्मकार्याचा प्रसार होत असल्याचे पाहून समाधान वाटते असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले‌ यावेळी दैवशाला गायकवाड यांनीही आपले अनमोल विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री नेताजी बनसोडे, शरद बनसोडे, पीडी कंपनीचे सर्व प्रतिनिधी सुरजी बनसोडे, किरण कांबळे, सुमेध कांबळे, सौदागर कांबळे, निलेश कांबळे, मंगेश बनसोडे, अनिकेत बनसोडे, सोनाजी बनसोडे, यशवंत कांबळे, आयुष कांबळे, विशाल बनसोडे यांनी परिश्रम घेतले. वर्षावास कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व बौद्ध उपासक, उपासिका यांना खीरदान करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments