नाशिकमध्ये २४ व २५ डिसेंबरला

मुस्लिम मराठी साहित्य संमेलन होणार
केंद्रीय सचिव नल्लामंदू यांची माहिती
🔳
 स्वागताध्यक्षपदी इरफान शेख यांची निवड
.🔳
नाशिक- अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदद्वारे २४ व २५ डिसेंबरला नाशिकमध्ये होऊ घातलेल्या नवव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कामगारनेते तथा सामाजिक विचारवंत इरफान रशीद शेख यांची एकमताने निवड करण्यात आली. सोलापूरच्या अ . भा मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय समितीच्या कार्यकारिणीने निवड केल्याची अधिकृत घोषणा केली
 २००२ नंतर पुन्हा नाशिकला संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे.

नाशिक रोड मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी इरफान शेख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अनेक संघटनेच्या वतीने सत्कार  करण्यात आला
 संमेलनापूर्वी यासाठी विविध स्पर्धाचं  आयोजन करण्यात येत आहे. त्याचे विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत 
 शहरातील दादासाहेब  गायकवाड सभागृहात संमेलन होणार आहे यात लेखक गीतकार जावेद अख्तर,  माजी कुलगुरू फैजान मुस्तफा, सरफराज, शेख . आहे. प्रा. जावेद पाशा, उपस्थित राहणार अशी माहिती नाशिकचे प्राचार्य डॉ . फारुक शेख यांनी दिली  संमेलनात, ९ परिसंवाद  कविसंमेलन, एकपात्री नाटक, चित्रकला स्पर्धा होणार आहेत 

 आज १६ रोजी नाशिक येथे नववे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन परिषदेच्या रविवारी  झालेल्या बैठकीत केवळ स्वागताध्यक्षांची निवड झाली. व 
 येत्या ३० ऑक्टोबरला संमेलन अध्यक्षांची निवड होणार आहे. कार्यक्रम पत्रिका, बोधचिन्ह देखील प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे स्वागताध्यक्ष श्री. शेख यांनी सांगितले.
नवनिर्वाचित स्वागताध्यक्ष इरफान शेख यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी मंचावर माजी उपमहापौर गुलाम ताहर , अरुण घोडेराव, युसूफ बेन्नूर, हसीब नदाफ, मजहर अल्लोळी , प्रा. ई. जा. तांबोळी, कवी मुबारक शेख, अय्युब नल्लामंदू, उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले.
 केंद्रीय सचिव नल्लामंदू मार्गदर्शन करत म्हणाले - साहित्यिक, कवी, हे समाज प्रबोधन साठी  लेखणी करतात , पुस्तके प्रकाशित करतात आणि आपल्या पुस्तके संमेलनाच्या स्टॉलवर ठेवतात आणि आपण यांचे पुस्तके किती प्रमाणात विकत घेतो हे आपल्याच मनाला विचारलेले बरं .. अशी खंत व्यक्त केली , या नंतर
खजीनदार हसीब नदाफ म्हणाले, साहित्यातून विचारांची जडणघडण व सामाजिक प्रबोधनाची चळवळ उभी राहिली पाहिजे, 
डॉ. बेन्नूर म्हणाले, साहित्यातून समाजाला दिशा मिळण्यासाठी मुस्लिम समाजाने वाचन, लेखन संस्कृतीकडे लक्ष केंद्रित करावे. प्रा.डॉ. तांबोळी म्हणाले, मुस्लिम तरुणांनी साहित्य चळवळ हातात घेऊन सामाजिक विकास साधला पाहिजे.

 संमेलनाच्या
 पूर्वतयारी बैठकीसाठी स्वागत समितीचे प्रमुख डॉ. लियाकत नामोले, केंद्रीय समितीचे सचिव अय्यूब नल्लामंदू , सहसचिव मुबारक शेख , उपाध्यक्ष  डॉ . तांबोळी . खजीनदार हसीब नदाफ, केंद्रीय सदस्य डॉ .युसूफ बेन्नर , मजहर अल्लोळी , नाशिकचे अरुण घोडेराव, संयोजक प्रा. डॉ. फारूक शेख,  हसन मुजावर, मुस्तफा शेख, अॅड. सलीम शेख, अॅड. नाजिम  आसीफ शेख , कवियत्री रजिया दबीर आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments