आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते विश्व वारकरी मंडळाचे उदघाटन.. 

औसा प्रतिनिधी 

आमदार या नात्याने वारकरी मंडळाला सर्वतोपरी मदत करु - आ. अभिमन्यू पवार औसा - महाराष्ट्र हि संताची भूमी या पवित्र भूमीत साधू संतांना एकत्रित करणे हे पवित्र काम आहे.संतामुळे राज्याला सांप्रदायिक वारसा मिळाला आहे वारकऱ्यांना मी विठ्ठलाच्या रुपात पाहातो सध्याच्या सरकारही देव व देशासाठी काम करणारे सरकार असून आमदार या नात्याने वारकरी मंडळाला सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे. 


             औसा येथील विजय मंगल कार्यालयात रविवार (दि. १६) रोजी आयोजित विश्व वारकरी मंडळाचा उद्घाटन समारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर विश्व वारकरी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हभप कुमार पाटील महाराज, हभप दतात्रय पवार गुरुजी,भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, विश्व वारकरी मंडळाचे औसा शहरध्यक्ष हभप सौ. महानंदा कठारे, जिल्हा सचिव हभप मारुती सगर, हभप सौ. महानंदा मिटकरी, हभप नागनाथ दळवे, हभप नरसिंग जाधव, हभप रंगराव सुर्यवंशी, हभप सौ. भारतताई औटी, हभप वसंत सर्जे, हभप सुधीर कदम, हभप संतोष पोतदार, हभप योगीराज वळके, लक्ष्मण शिंदे, हभप व्यंकट माने आदीसह मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते. 

               यावेळी आमदार अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की वारकरी संप्रदायासाठी औशात एक सभागृहाची उभारणी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल या देशात नेतृत्व करणारे सरकारही साधू संताचे आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हभप कुमार पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments