प्रा. सुधीर पोतदार यांचा भारतीय जनता पार्टी प्रवेश
 औसा प्रतिनिधी
 ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक आपल्या स्पर्धा केंद्राच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी करून अनेकांचे उज्वल भवितव्य घडविणारे प्राध्यापक सुधीर दत्तात्रय पोतदार यांनी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रा. सुधीर पोतदार यांनी 2019 मध्ये वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने औसा मतदार संघात विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षामध्ये मराठवाडा विभागीय ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. काँग्रेस पक्षात आपणास सन्मानाची वागणूक मिळत नसल्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले, भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तथा आमदार देवयानी फरांदे, औसा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, युवा नेते संतोष आप्पा मुक्ता, बंकटराव पाटील,  तसेच महिला मोर्चाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणाला अनुसरून आपण पक्ष संघटन कार्यात प्रामाणिकपणे येणाऱ्या काळात काम करत राहू असा विश्वास प्रा. सुधीर पोतदार यांनी याप्रसंगी व्यक्त केला‌ पक्ष संघटन कार्य पक्ष वाढीसाठी ईमानी  ईदबारीक काम करू असा विश्वास माझ्यापाशी त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments