धावण्याच्या स्पर्धेत ऋतुजा घाडगे यांचे यश
 औसा प्रतिनिधी
 कुमारी ऋतुजा सुभाष घाडगे राहणार टाका ही श्री कुमार स्वामी महाविद्यालय औसा येथे बीए द्वितीय वर्ष वर्गात शिकत असणाऱ्या या शेतमजुराच्या मुलीने धावण्याच्या स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्णपदकाचा बहुमान मिळविला आहे. दयानंद महाविद्यालय लातूर येथे झालेल्या स्पर्धेनंतर या विद्यार्थिनीची वसमत जिल्हा हिंगोली येथे विभागीय पातळीवरील स्पर्धेमध्ये निवड झाली होती. या स्पर्धेत ऋतुजा घाडगे या विद्यार्थिनीने सुवर्णपदक मिळविले असून नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये नोव्हेंबर महिन्यात ती सहभागी होणार आहे. तिच्या या उज्वल यशाबद्दल कॉम्प्युटर पार्कचे संचालक काशिनाथ सगरे, संचालिका सौ वर्षा सगरे, मीना जनगावे, पत्रकार राम कांबळे, शिवाजी मोरे, श्रीकांत चालवाड, कृष्णा सूर्यवंशी, मंगेश गाडेकर, कृष्णा जाधव यांच्यासह कॉम्प्युटर पार्कचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अभिनंदन करून ऋतुजा घाडगे हिचा सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments