*सुशिल वाघमारे यांना स्व. विठ्ठलराव शिंदे गुरुगौरव पुरस्कार प्रदान.* *चाकुर*
चाकूर तालुक्यातील चापोली येथील सहशिक्षक सुशिल रंगनाथ वाघमारे यांना सोमवारी गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चापोली येथील आशा ,अंगणवाडी कार्यकर्ती,आरोग्य कर्मचारी यांच्या सोबत घरोघरी जाऊन कोरोनाबाबत जनजागृती केली. मुंबई पुण्याहून आलेल्या जनतेला कॉरंटाईन करून घेण्यास सुचित केले. विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने शिक्षण तर दिलेच शिवाय घरोघरी भेटी देऊन प्रत्यक्ष भेटून शिक्षण देण्याचे कार्य केले. शालबाह्य विध्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून शाळेत जाण्यास प्रवृत केले. वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात अभिरुची बाळगून वृक्ष लागवड केली आहे. सम्यक या राष्ट्रीय एन. जी. ओ च्या माध्यमातून स्त्री विषयक लिंग भेदभाव,सुरक्षित गर्भपात,आणि स्त्री आरोग्य जनजागृतिबाबत कार्य केले. कोरोनाकाळात दीपावलीच्या निमित्ताने गरजवंत्ताना दीपावलीचा फराळ वाटप करूच दीपावली साजरी केली. स्वतः बरोबर नातेवाईकांचे वाढदिवस ही शैक्षणिक साहित्य वाटप करून गरीब होतकरू मुलांमुलींना मदत करून , 33 वेळा रक्तदान करून साजरे केले आहेत.मात्र प्रसिद्धीपासून कोसो दूर राहिले आहेत. स्काउट गाईड च्या माध्यमातून कार्य करत आहेत. परिवर्तनवादी विचाराच्या महापुरुषंच्या जयत्या प्रबोधन करून सजऱ्या केल्या आहेत. त्यांचे कार्य पाहून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ लातूर द्वारा लोकनेते विलासराव देशमुख लातूर भूषण पुरस्कार 2021 , शब्दगंध समूह प्रकाशन औरंगाबद द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय समजभूषण पुरस्कार तसेच पत्रकारिता क्षेत्रातील पद्मश्री डॉ विठ्ठलरावं विखे पाटील कृषी परिषद लातूर द्वारा माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे,शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते जिल्हास्तरिय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर राहून केलेल्या कार्याची दखल घेवून स्व. विठ्ठलरावं शिंदे गुरुजी गुरुगौरव स्मृती पुरस्कार डॉ. किशनराव भोसले, पोलीस उप निरीक्षक किशोर पाटील यांच्या हस्ते हाळी खु ता चाकूर येथे प्रदान करण्यात आला. यापूर्वी समाजिक क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त झाले मात्र हा शिक्षणिक क्षेत्रातील प्रथमच पुरस्कार् प्राप्त झाला आहे.तो त्यांनी विध्यार्थी व आई वडील यांना अर्पण केला आहे.त्यांना मिळालेल्या पुरस्कारबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.....
0 Comments