औसा शहरातील मोकाट कुत्रे व वराह चे त्वरीत बंदोबस्त करा:
औसा प्रतिनिधी
औसा शहरात मागील अनेक महिन्यापासून भटक्या मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे वयोवृध्द नागरीक, लहान मुलांना हे कुत्रे चावा घेत असून ज्यामुळे नागरीकांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. वारंवार औसा नगर परिषदेला कल्पना देऊनही औसा नगरपालीका या बाबत गंभीर दिसत नाही. व तसेच औसा शहरात दिवसेनदिवस मोकाट वराहची संख्या वाढल्यामुळे नागरीकांना यामुळे अडचण निर्माण होत आहे. व तसेच हे वराहाची संख्या जास्त करून अल्पसंख्यांक वसाहतीत आहे. यामुळे लहान मुलांना घराच्या बाहेर फिरताही येत नाही. तरी मे. साहेबांनी त्वरीत या दोन्ही विषयाबाबत लक्ष घालून औसा शहरातील मोकाट कुत्रे व वराहाचे शंभर टक्के बंदोबस्त करण्यात यावा.अशी मागणी विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुस्तफा मुल्ला यांनी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना 10 आॅक्टोंबर सोमवार रोजी निवेदन दिले आहे.
0 Comments