*दाऊतपूर येथे कै.कोंडीबा देवराव बिडगर यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्ताने* 

*ह. भ. प. व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे कीर्तन होणार*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील दाऊतपूर येथील माजी सरपंच, ज्येष्ठ नागरिक कै.कोंडीबा देवराव बिडगर  यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त  ह. भ. प. व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे कीर्तन होणार आहे. तरी  किर्तनाचा व भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन बिडगर कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
         परळी तालुक्यातील मौजे दाऊतपूर येथील माजी सरपंच, जेष्ठ नागरिक, सामाजिक, शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व  कै.कोंडीबा देवराव बिडगर यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने  अश्विन शु.10 (विजयादशमी) बुधवार दि.5 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 ते 1 ह.भ.प. व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे कीर्तन होणार आहे. परळी तालुक्यातील व शहरातील तसेच पंचक्रोशीतील सर्व गुणीजण महाराज, गायक, वादक, भजनी मंडळी   तसेच ग्रामस्थ, नातेवाईक, परिसरातील भाविकांनी सुश्राव्य किर्तन ऐकण्यासाठी व भोजनासाठी श्री हनुमान मंदिर दाऊतपूर  (परळी ते गंगाखेड रोडवर) येथे उपस्थित रहावे असे आवाहन ज्ञानोबा देवराव बिडगर, लिंबाजी देवराव बिडगर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments