पतंजली योग समितीची आज औसा येथे बैठक 
औसा प्रतिनिधी -पतंजली योगपीठ हरिद्वार संचलित पतंजली योग समितीच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक रविवार दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी श्री मुक्तेश्वर विद्यालय बस स्थानका शेजारी औसा येथे आयोजित करण्यात आली आहे. आरोग्यम् धनसंपदा हे ब्रीदवाक्य घेऊन प्रत्येक मानवाच्या आरोग्य रक्षणासाठी पतंजली योग समिती कार्यरत आहे. आपले आरोग्य अबाधित राखण्यासाठी योग प्राणायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी सह राज्य प्रभारी अनिल अमृतवार जिल्हाध्यक्ष राम घाडगे कोषाध्यक्ष राजाभाऊ खंडाळे जिल्हा सह प्रभारी निशांत देशमुख महामंत्री मल्लिनाथ रोडगे आदी मान्यवर उपस्थित राहून सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तरी योग प्रेमी बांधवांनी आपल्या कुटुंबासह या बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन पतंजली योग समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments