मुक्तेश्वर पडसलगे यांचे निधन
 औसा प्रतिनिधी
 औसा येथील जिल्हा परिषद शिक्षक मुक्तेश्वर भीमाशंकर आप्पा पडसलगे यांचे शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने पुणे येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. दिवंगत मुक्तेश्वर पडसलगे यांनी केसरी या मित्र मंडळाची स्थापना करून सामाजिक कार्यात सक्रियता दाखवली तसेच महात्मा गांधी विचार मंचचे ते कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक विवाहित मुलगी एक मुलगा नातू असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर गुलमठ लिंगायत स्मशानभूमी औसा येथे शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी शैक्षणिक सामाजिक राजकीय व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरासह नातेवाईक समाज बांधव व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments