औशात डेंग्यूची औषध फवारणी
औसा प्रतिनिधी
औसा शहरात नगरपरिषदेच्या वतीने डासांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन प्रशासक तथा मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या आदेशानुसार औसा शहरातील प्रभाग क्रमांक 5 व प्रभाग क्रमांक 6 मध्ये डेंग्यू औषध फवारणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे.आज शहरातील हसीना ऊर्दू शाळेच्या परिसरात स्वच्छता निरीक्षक महेमूद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गटारी व अस्वच्छता परिसर येथे डेंग्यू औषध फवारणीची सुरुवात करण्यात आली.औसा शहरात गेल्या काही दिवसांपासून डासांचे प्रमाण वाढत असल्याने शहरातील बालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.मात्र आता औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी औसा शहरात डेंग्यू चे प्रमाण वाढू नये यासाठी आता डेंग्यू औषध फवारणीची सुरुवात केली आहे.प्रभाग क्रमांक 5 मध्ये नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक महेमूद शेख व कर्मचारी सुनील माने, दत्ता शिंदे, सिध्दु लोंढे यांनी डेंग्यू औषध फवारणी करत आहेत.
0 Comments