भारत स्वाभिमान च्या वतीने औसा येथे 5 हजार साधकांच्या योग प्रशिक्षण शिबिराचा संकल्प अनिल अमृतवार
 औसा प्रतिनिधी
 पतंजली योगपीठ हरिद्वार संचलित पतंजली योग समिती आणि भारत स्वाभिमान यांच्या वतीने औसा येथे 5  हजार साधकांच्या योग प्रशिक्षण शिबिराचा संकल्प करण्यात आला असून औसा शहरांमध्ये भव्य दिव्य योग प्राणायाम शिबिराचे आयोजन अल्पावधीत होणार असल्याची माहिती राज्यसह प्रभारी अनिल अमृतवार यांनी दिली. औसा येथे पतंजली योग समितीच्या बैठकीत रविवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी श्री मुक्तेश्वर विद्यालय औसा येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर सर्वश्री शिवाजी शिंदे नांदेड, राम घाडगे, राजाभाऊ खंदाळे, मल्लिकार्जुन रोडगे, निशांत देशमुख, रुपेश कारंजे, आकाश पाटील यांची उपस्थिती होती. योगशिक्षक नेताजी सावंत आणि छाया शेवाळे यांच्या सहकार्याने औसा येथे श्री मुक्तेश्वर विद्यालय येथे दररोज योगाचे शिक्षण दिले जाते. आरोग्य धनसंपदा हे ब्रीदवाक्य सोबत घेऊन प्रत्येक नागरिकांनी स्वतःचे आरोग्य रक्षण करावे आणि निरोगी जीवन जगता यावे यासाठी येणाऱ्या काळात योगाशिवाय पर्याय नसल्याचे अनिल अमृतवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. हिमाचल प्रदेश मध्ये प्रत्येक शाळेमध्ये योगशिक्षक नियुक्त केलेले आहेत जगातील 2000 देशांमध्ये आज योग प्राणायाम करण्यात येत असून 21 जून हा योगा दिन साजरा होत असून योग प्राणायाम च्या माध्यमातून भारत देशाची आज विश्वगुरू पदाकडे वाटचाल सुरू असल्याने भारत देशाच्या दृष्टीने ही गौरवास्पद बाब असल्याचे शेवटी अमृतवार यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी भारत स्वाभिमांचे औसा तालुका कार्यकारणी करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमासाठी कोमल सावळकर, सुमन गजाकोश, रंजना सावंत, दीपमाला चव्हाण, स्वाती माळी, कविता कटके, सुमन कोकणे, मीनाक्षी कटारे, विद्या गरड संतोष कटारे, राम कांबळे, कृष्णा पाटील, सिद्धेश्वर शिराळ, साळुंखे डॉ. श्रीमंत क्षीरसागर, एम बी  मनियार, यांच्यासह अनेक योगप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी अनुराग नेताजी सावंत यांनी मयुरासनाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. भारत स्वाभिमान औसा तालुका शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments