औसा शहरातील दिव्यांग बाधवांचे थकीत निधीचे हप्ते त्वरीत वाटप करा:खुंदमीर मुल्ला
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील दिव्यांग बाधवांचे थकीत 5 टक्के नगरपालिका निधीचे हप्ते त्वरीत वाटप करा अशी मागणी विलासराव देशमुख युवा मंचच्या वतीने आज दिनांक 19 आॅक्टोंबर बुधवार रोजी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.त्याचे सविस्तर वृत्त असे औसा शहरातील नगरपालिकेला नोंदणीकृत पात्र दिव्यांग बांधवांसाठी नगर पालिकेत शासनाच्या निर्णयानुसार 5 टक्के निधी आरक्षित ठेऊन सदरील निधी हे दिव्यांग बांधवांना वाटप करण्याचे आदेश असताना औसा नगरपरिषदेच्या वतीने मागिल एक ते दिड वर्षांपासून नगरपालिकेने दिव्यांग बांधवांच्या खात्यात निधीचा एकही हप्ता टाकलेला नसल्यामुळे सद्या ऐन दिवाळीच्या तोंडावर दिव्यांग बांधवांची आर्थिक कोंडी होत आहे.तरी मुख्याधिकारी यांनी त्वरित दिपावलीच्या अगोदर दिव्यांग बांधवांच्या खात्यावर थकीत दिव्यांग निधीचे हप्ते वर्ग करुन दिव्यांग बांधवांची दिपवाली गोड  करावी. या मागणीसाठी विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुल्ला यांनी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments