पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना त्वरित तीसरा हप्ता वाटप करा: राष्ट्रवादी काँग्रेसचे मागणी 
औसा प्रतिनिधी
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत औसा शहरातील एकूण 421 लाभार्थ्यांना तीसरा हप्ता त्वरित वाटप करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औसाच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे,औसा शहरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 421 लाभार्थ्यांना पहिला व दुसरा हप्ता वाटप केलेला आहे.सदर लाभार्थ्यांना तीसरा हप्ता वाटप न झाल्यामुळे त्यांचे बांधकाम अर्धवट राहिलेले आहेत व ते सध्या बेघर झाले आहेत.सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे सदर लाभार्थ्यांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे,तर कांही  लाभार्थ्यांनी व्याजाने पैसे घेऊन आपले बांधकाम चालू ठेवले आहेत,व त्यामुळे ते कर्जबाजारी होत आहेत.तरी त्यांना तीसरा हप्ता देणे अत्यंत गरजेचे आहे.तसेच नगर परिषद च्या खात्यावर रक्कम/ अनुदान असूनही हप्ता वाटप केला जात नाही, ही अतिशय खेदाची बाब आहे.तरी मुख्याधिकारी यांनी या बाबीचा विचार करून  पंतप्रधान आवास योजनेच्या 421 लाभार्थ्यांना त्वरित तीसरा हप्ता वाटप करावे अन्यथा, तिवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औसाच्या वतीने दिनांक 7 आॅक्टोंबर शुक्रवार  रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मेहराज शेख, माजी पाणीपुरवठा सभापती गोंवीद जाधव, अँड.सय्यद मुस्तफा इनामदार,उमर पंजेशा,अनवर करपुडे, फारुक करपुडे,अलीम शेख,शेरु शेख, जुबेर शेख,सलाऊद्दीन सावकार आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments