कृषी विभागाच्या वतीने आत्मा अंतर्गत भाजीपाला बियाणे वाटप
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील कन्हेरी येथे 2022-23 कृषी विभाग आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी परसबाग भाजीपाला बियाणे किट सुरक्षित अन्न योजनेचा माध्यमातून मौजे. कन्हेरी, ता- औसा येथील 20 भाजीपाला उत्पादक महिला शेतकऱ्यांची निवड करुन भाजीपाला बियाणे किटचे वाटप कन्हेरी येथे वाटप करण्यात आले कन्हेरी गावचे पोलीस पाटील, बालाजी पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष नागेश बोडके, चेरमन श्री. अनिल पाटील, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, मारुती महाराज साखर कारखानाचे संचालक श्री. अनिल झिरमीरे, सोसायटी संचालक श्री. प्रल्हाद आळंगे व सामाजिक कार्यकर्ते श्री. अमोल पांचाळ व गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
यासाठी तालुका कृषि अधिकारी औसा श्री.ढाकणे साहेब, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यस्थापक श्री. विनायक गायकवाड, श्री. विकास पवार यांच्या सहकाऱ्यातून हा कृषी विभाग आत्मा पोषणमूल्य परसबाग भाजीपाला बियानाचे वाटप कन्हेरी येतील 20 महिलांना वाटप करण्यात आले.
0 Comments