विजयादशमीनिमित्त औसा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विराट पथसंचलन
औसा प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 1935 मध्ये नागपूर येथे स्थापना झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून देश विदेशामध्ये आज संघ कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असून भारत देशाला हिंदूराष्ट्र म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या कार्याला सुरुवात केली असून संघाच्या वतीने औसा येथे मधुस्मृती संघ कार्यालयासमोर डॉ.विजय माणिकराव जाधव शिवलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शस्त्रपूजन करण्यात आले. या शस्त्र पूजन कार्यक्रमानंतर शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पूर्ण गणवेश परिधान करून विराट पथसंचलन करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मागील एक महिन्यापासून सराव करून संघ कार्यकर्त्यांनी संचलनची तयारी केली होती. अतिशय आकर्षक अशा घोषाच्या निनादांमध्ये शहरातून संघ कार्यकर्त्यांचे पथसंचलन जात असताना नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून विश्वहिंदू परिषद, राष्ट्रसेविका समिती, दुर्गा वाहिनी, अशा विविध विभागामार्फत देशातील सर्व जाती-धर्मापर्यंत संघाचे कार्य पोहोचविण्याचा उपक्रम सुरू असून आदिवासी व इतर सर्वच क्षेत्रांमध्ये सामाजिक समरसतेचा संदेश संघाच्या माध्यमातून दिला जातो. विजयादशमीनिमित्त औसा शहरात संघ कार्यकर्त्यांनी पथसंचलन काढून विजयादशमीचा आनंद साजरा केला.
0 Comments