दंत शल्य चिकित्सा अभ्यासक्रमात मयुरी कोथळे यांचे उज्वल यश 

औसा प्रतिनिधी

 लातूर येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स अँड रिसर्च या महाविद्यालयातून दंतशल्य चिकित्सा अभ्यासक्रमात झालेल्या परीक्षेमध्ये औसा येथील कुमारी मयुरी वीरभद्र कोथळे सिंदुरे या विद्यार्थिनीने 1600 पैकी 11 61 मार्क घेऊन उज्वल यश संपादन केले आहे. कुमारी मयुरी कोथळे या विद्यार्थिनीने अत्यंत मेहनत करून व महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन घेऊन सतत अभ्यास केल्यामुळे तिला चांगले गुण संपादन करता आले त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे तसेच श्री मुक्तेश्वर जेष्ठ नागरिक संघाचे शंकराप्पा सिंदुरे, प्रकाश वाघमारे, लक्ष्मीकांत कुलकर्णी विद्यार्थिनीचे वडील विरभद्र सिंदुरे आई स्नेहलता सिंदुरे यांनीही मयुरीच्या यशाबद्दल शुभेच्छा देऊन कौतुक केले.

Post a Comment

0 Comments