रामनाथ विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात संपन्न 

औसा प्रतिनिधी 

आलमला:- रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला तालुका औसा येथे दिनांक 15 ऑक्टोबर  रोजी विद्यालयाच्या प्रांगणात भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल एपीजे कलाम यांच्या जन्म दिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉक्टर अब्दुल एपीजे कलाम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे पदाधिकारी श्री प्रभाकर कापसे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. व त्यानंतर पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन ही विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अनिता पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या दिनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करण्याचा संकल्प विद्यालयाने केला होता. आणि असंख्य विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तकप्रदर्शनास भेट दिली व अनेक पुस्तकांचे अवलोकन केले. याप्रसंगी ग्रंथपाल श्री रामेश्वर सगर यांनी वाचन प्रेरणा दिनाची पूर्वतयारी केलेली होती त्यास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुस्तक प्रदर्शनास भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments