ईद -ए -मिलादुन्नबीच्या   निमित्ताने भव्य रक्तदान व सर्व रोग निदान शिबीर संपन्न 


 औसा येथे 130 युवकांसह महिलेंनी केले उत्स्फूर्त रक्तदान
 
औसा प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक नियमांमुळे मागील दोन वर्ष देशातील सर्व सण,उत्सवांवर प्रतिबंध घालण्यात आले होते.परंतू या वर्षी सदरील प्रतिबंध हटविण्यात आल्यामुळे सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहेत.याच अनुषंगाने संपूर्ण जगाला शांती व समतेचा संदेश देणारे  इस्लाम धर्माचे प्रेषित पैंगबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम यांच्या 
जश्ने ईद-ए- मिलादुन्नबीच्या निमित्ताने जाफर पटेल युवा मंच व अफसर शेख युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर सर्व रोग  निदान व रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.त्या अनुषंगाने आज दिनांक 9 आॅक्टोंबर  रविवार रोजी औसा शहरातील कटगर गल्ली येथील शादीखाना येथे भव्य रक्तदान शिबीर व सर्व रोग निदान शिबिर व रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबीरामध्ये 130 युवकासह महिलेने ही उत्स्फूर्त रक्तदान केले.व त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.  सर्व रोग निदान शिबिरामध्ये 75  रक्ताची तपासणी करून घेतली.तर 125 नागरिक व महिलांनी सर्व रोग निदान शिबिरामध्ये आपल्या आरोग्याची तपासणी करून मोफत उपचार करुन घेतले.आणि या शिबिराचा लाभ घेतला.या सर्व रोग निदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.या शिबीराच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष अँड श्रीकांत सुर्यवंशी हे होते.तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस लातूर ग्रामीणचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ अफसर शेख यांची उपस्थिती  होती.या शिबिराची शुरुवात  मदरसा अरबीया सिराजूल बनात औसा कारी मोहम्मद रफीक सिराजी यांच्या हस्ते रिबीन कापून  करण्यात आली.  शिबिरात तज्ञ डॉक्टर्स सना हाॅस्पीटल लातुरचे डॉ अफसर शेख,  डॉ.एजाज शेख, डॉ.निकहत अब्दुल पठाण यांनी रुग्णांची तपासणी करून औषधी वितरीत केले. डॉ.मो.फैज उर रहमान, डॉ.युनुस पटेल,  आधार लॅबचे अतीख शेख यांनीही या शिबिरात आलेल्या रूग्णांची रक्त व शुगरची तपासणी मोफत केली. या शिबिराला संजीवनी ब्लड बँक लातुर यांनी सहकार्य केले. यावेळी या शिबिरात  औसाचे ए. पी, आय. सानप सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर आर शेख.,माजी नगराध्यक्ष जावेद शेख,माजी नगराध्यक्ष मेहराज शेख,माजी पाणीपुरवठा सभापती गोंवीद जाधव,माजी नगराध्यक्ष भरत सुर्यवंशी,माजी स्वच्छता सभापती मुजाहेद शेख, युवा नेते फहाद अरब, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुलेमान अफसर शेख,सना मेडिकल औसा मोहसीन पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पाशा शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे लेखापाल अब्दुल हक्क शेख,अहेमद पटेल,मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे,माजी नगराध्यक्षा सौ. किर्ती ताई कांबळे, उस्मान सिद्दीकी,वली पठाण, बालाजी शिंदे,फेरोज पटेल, आदर्श नेताचे संपादक जाफर पटेल, अविनाश टिके, अँड शिवाजी सावंत,संताजी राजकुमार औटी,उमर पंजेशा मलवाड, संगमेश्वर उटगे, गजेश्वर राजे शिंदे आदिची या शिबिरामध्ये  उपस्थिती होती. 
 या शिबिराला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जाफर पटेल युवा मंच व अफसर शेख युवा मंच औसाचे  जाकेर पटेल, अँड.मुस्तफा वकील इनामदार,मुन्ना देशमुख, अँड फय्याज सय्यद, डॉ. मजहर पटेल आदिनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments