दीपावली निमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयात 4 वस्तूंचा संच 
औसा प्रतिनिधी
 महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार 2022 च्या दीपावलीनिमित्त शिधापत्रिका धारकांना 100 रुपयांमध्ये 1 लिटर गोडेतेल, 1 किलो चणा डाळ, 1 किलो रवा, आणि 1 किलो साखर अशा 4 शिधा जिन्नसाचा संच पुरवठा विभागाच्या वतीने शिधापत्रिकाधारकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. औसा तालुक्यातील अंत्योदय योजनेतील 6253 प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी 43 हजार 505 आणि शेतकरी अन्नसुरक्षा योजनेतील 9806 अशा एकूण 59,464 कुटुंबांना मशीनद्वारे वाटप करण्याचा निर्णय घेतला असून औसा तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामार्फत 4 शिधा जिन्नसांचा संच प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे तरी लाभार्थ्यांनी दिपवाली निमित्त या शिधाजीन्यसाचा लाभ घ्यावा. असे आवाहन तहसीलदार भरत सूर्यवंशी व तालुका पुरवठा अधिकारी लालासाहेब कांबळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments