हसेगाव येथे फार्मादर्शन स्पर्धा उत्साहात संपन्न
 औसा प्रतिनिधी
 श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था हासेगाव संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने शनिवार दिनांक 1  ऑक्टोबर रोजी औषध निर्माण शास्त्र विभागाच्या वतीने फार्मादर्शन 2022 या उपक्रमा अंतर्गत औषध निर्माण शास्त्रातील प्रयोगशाळेत तयार केलेल्या विविध औषधांची माहिती व पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव येथील विद्यार्थ्यांनी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून वेगवेगळ्या प्रकारचे औषधी, तसेच मशीनचे संशोधन करून पोस्टर प्रेसेंटेशन करून उपस्थितांना औषध निर्माण शास्त्र विभागाची माहिती दिली. प्रत्येक मानवाच्या आरोग्य रक्षणासाठी उपयुक्त अशा औषधी बाबत सचित्र माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, डॉ रमाकांत घाडगे, वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, संतोष मुक्ता आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवलिंग जेवळे प्राचार्य, डॉ शामलीला बावगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर स्वागत गीत करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्यामलीला बावगे यांनी केले. सचिव वेताळेश्वर बावगे यांनी संस्थेमार्फत सुरू असलेल्या उपक्रमाची सविस्तर माहिती विशद केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फार्मादर्शन उपक्रमा अंतर्गत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले वेताळेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हासेगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे संकुल उभा केले तसेच या संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून थेट नोकरीचे संधी उपलब्ध होत असल्याबद्दल संस्थेच्या या उपक्रमाबद्दल आमदार महोदयांनी गौरव उद्गार काढले. विविध कंपनीमध्ये कॅम्पस मुलाखतीतून यशस्वी झालेल्या तरुणांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
 हासेगाव ता. औसा येथील गुरुनाथ आप्पा बावगे नॉलेज सिटी या शैक्षणिक संकुलामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये लातूर जिल्ह्यातील औषध निर्माण शास्त्र विभागातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक यांनी सहभाग नोंदविला होता.

Post a Comment

0 Comments