स्वच्छता निरीक्षक बालाजी कांबळे यांचा जिल्हाधिकारी यांनी केला सन्मान 
बी डी उबाळे
औसा-औसा येथील नगरपरिषद कर्मचारी तथा स्वच्छता निरीक्षक म्हणून चांगल्या पद्धतीचे काम करणारे बालाजी धोंडीराम कांबळे हे स्वच्छता निरीक्षक या पदावर कार्यरत असून घनकचरा व्यवस्थापन वर्गीकरण या मध्ये उत्कृष्ट असे कार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी नुकताच नगरपरिषद औसा येथे केला आहे.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी म्हणाले की घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनास नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे,तहसीलदार भरत सूर्यवंशी, मुख्याधिकारी रणदिवे आणि औसा तालुक्यातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
औसा शहरात स्वच्छता निरीक्षक बालाजी कांबळे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात असून विशेष बाब म्हणून त्यांचे धम्मदीप डांगे यांनीही त्यांचे विशेष आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments