औसा प्रतिनिधी
औसा तालुका शिवसेनेच्या वतीने शासकीय विश्रामगृह औसा येथे औसा तालुक्यातील बेलकुंड येथील श्री संत मारुती महाराज सहकारी साखर कारखाना संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली.या पत्रकार परिषदेत माजी आमदार दिनकर माने यांनी कारखान्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे.हा भ्रष्टाचार कारखान्याच्या संचालक मंडळांनी केला असून त्याची चौकशी झाली पाहिजे अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली असून त्याचे सविस्तर वृत्त असे संचालक मंडळांनी त्यांच्या ताब्यात कारखाना दिला त्यावेळी 10 कोटीचे कर्ज या कारखान्यावर होते.या आत्ताच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण अहवालाप्रमाणे बघितले तर या कारखान्यावर आज 50 कोटीचे कर्ज झाले आहे.आणि स्थावर जंगम मालमत्ता मध्ये वाढ झालेली मी पाहिले तर फक्त अडीच कोटींची स्थावर जंगम मालमत्ता या कारखान्याची वाढली आहे.म्हणजे 40 कोटी कर्जामध्ये फक्त असीटमध्ये अडीच कोटींची वाढ झाली आहे.या कारखान्यांमध्ये या एक हंगाम चालवण्यामध्ये 2 ते अडीच कोटी चा तोटा दाखवण्यात आला आहे.आणि दुसरा सभासदांना सुध्दा योग्य भाव दिला नाही.मारुती महाराज साखर कारखाना मराठवाड्यामध्ये 2 नंबरचा रिकवरीचा असलेला हा कारखाना आणि या मारुती महाराज साखर कारखानाच्या इतिहासामध्ये 11 रिकवरीच्या खाली कधी रिकवरी आली नसतांना या वर्षांची रिकवरी 10 -39 हे जाणीवपूर्वक दाखवण्यात आले आहे. एकेकडे मोलॅसिस प्रसेंटच 5 टक्के वाढविले आहे.खरतर मोरे सेस प्रसेंटचे 3 टक्के असायला पाहिजे होते.मागे मी चेअरमन असतांना कालखंडाच्या इतिहास जर बघितलं तर 5 टक्के मोरे सेस कधीच निघाला नाही, परंतु या वर्षी 5 टक्के मोलॅसिस दाखविले आहे.म्हणजे रिकव्हरी कमी दाखविण्यासाठी एवढे मोरे सेस चे प्रमाण वाढविले आहे.ब्राऊन शुगर प्रमाण वाढविले आहे.या पध्दतीने रिकवरी कमी दाखवून जर रिकव्हरी चांगल्या प्रकारे दाखविली असती तर शेतकऱ्यांना आणखी 5 ते 6 कोटी रुपये म्हणजे प्रती टन आणखी 200 ते 300 रूपये मिळाली असते.तरी हेसुद्धा या लोकांनी या शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा काम या लोकांनी केले आहे.आणि मिळून कारखान्याचा नूसते रिपेअर मेंटेनन्स झालं आहे.आणि या कारखान्यांवर 40 कोटीचा कर्ज झाले आहे.मी समजू शकतो 4 ते 5 वर्ष हा कारखाना बंद होता.कारखाना रिपेअर मेंटेनन्स करायला 10 कोटी रुपये खर्च आला असता तर मी मान्य केला असता, परंतु आज पूर्वीचा कर्ज 10 कोटी रुपये आणि आत्ताचा कर्ज बघितले तर 50 कोटी रुपये म्हणजे 40 कोटी रुपये नुसतेच रिपेअर मेंटेनन्स मध्येच खर्च केला आहे.आणि निव्वळ तिच्यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार या माध्यमातून या संचालक मंडळांनी केलेला आहे.त्याची चौकशी झाली पाहिजे असा आरोप माजी आमदार दिनकर माने यांनी आज दिनांक 30 संप्टेंबर शुक्रवार रोजी पत्रकार परिषदेत केला आहे.यावेळी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे सतीष शिंदे,सूरेशदादा भुरे, सुरेश पवार,जया ताई उटगे,पिंटू माने, संजय उजळांबे, आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments