महिला सक्षमीकरणाचा योद्धा: नरेंद्र मोदी
...............................

 देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणासाठी महिला रक्षा, शिक्षा, आरोग्य, विकास, व सक्षमीकरण या सगळ्या बाबीचा विचार करणारे नेतृत्व गुजरात राज्यात जन्माला आले. भारत देशामध्ये अत्यंत आत्मीयतेने, जिद्दीने व निर्भीडपणे महिलांना सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक, क्रीडा विषयक आणि शेती इत्यादी क्षेत्रांमध्ये सक्षम बनविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने महिला सक्षमीकरणासाठी अनमोल रत्न जन्माला आले आहे.  एक कर्तबगार पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाच्या अंतर्गत मुलींना सुरक्षा, समानता, व समाजातील मुली विषयी असलेली नकारार्थी भावना सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न केला आहे. मुलींनी जास्तीत जास्त शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करावी म्हणून मुलींच्या शिक्षणाला त्यांनी चालना दिली आहे. पंतप्रधान मातृत्व योजनेच्या माध्यमातून गर्भवती मुलांना सकस आहार घेता यावा व बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसतानाही अशा महिलांना 5000 रुपयांपर्यंत अर्थसाह्य देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बेबी केअर किट योजनेच्या माध्यमातून प्रसूती झाल्यानंतर गरीब महिलांना व नवजात बालकाची काळजी घेण्यासाठी योग्य ते साहित्य यामध्ये गादी, मच्छरदाणी, कपडे, साबण, तेल, सॉक्स, बूट, स्वेटर उपलब्ध करून दिले. प्रसूतीनंतर महिलांनी बाळाची काळजी घेण्यासाठी महिलांना मानसिक ताण तणाव येऊन महिलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते म्हणून बेबी केअर किट योजना त्यांनी सुरू केली. मातृत्व अवकाश योजनेच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांना प्रसूतीनंतर विश्रांतीसाठी सहा महिने विश्रांतीची योजना कार्यान्वित केली. नवजात बालकासोबत राहण्याची व्यवस्था पंतप्रधानांनी केली. महिला हे मानसिक व शारीरिक दृष्ट्या भक्कम व सुरक्षित राहण्यासाठी त्यांचा हा उपक्रम कौतुकास पात्र ठरणारा आहे. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून बालिकांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी योजना सुनिश्चित करण्यात आली. अत्यंत कमी गुंतवणुकीमध्ये सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून मुलीच्या भवितव्यासाठी आर्थिक तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियाना मधून महिला व बालकासाठी शाळा, घर कार्यालय इत्यादी ठिकाणी शौचालयाची उभारणी केली. तसेच रेल्वे बस स्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी सुलभ शौचालयाची योजना अमलात आणून महिलांच्या महत्त्वपूर्ण सुविधा सुरू केल्या. उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून देशातील कोट्यावधी महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना धुराचा त्रास होऊन मोठ्या प्रमाणात आजार होत होते. तसेच श्वास घेण्यासाठी व डोळ्यांना त्रास होत असल्यामुळे देशातील अनेक महिलांना या आजाराचा सामना करावा लागत होता. या बाबीच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन महिलांच्या निरोगी आरोग्यदायी जीवनाची त्यांनी काळजी घेतली. महिला बचत गटाच्या महिलांना बिनव्याजी व कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून बचत गटातील महिलांना लघु व कुटीर उद्योगाच्या माध्यमातून स्वावलंबी बनण्यासाठी त्यांनी मोठा आर्थिक आधार दिला आहे. महिला विकासाच्या अनेक महत्त्वपूर्ण योजनांना रमाई या नावाने आज ओळखले जात आहे. रमाई योजना हे नाव देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. नरेंद्र मोदी यांनी महिलासाठी त्यांना आत्मसन्मान, धाडस, स्वाभिमान आणि हक्काने जगण्याचा अधिकार देणारे खंबीर नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान रूपाने भारत देशामध्ये उदयास आले. भारत देशाला विकासाच्या यशस्वी शिखरा कडे घेऊन जाण्याचा त्यांचा आज प्रयत्न सुरू असून याचा मला सार्थ अभिमान आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी रक्षा, शिक्षा, विकास आणि इतर सर्व  सक्षमीकरणाच्या योजना आज प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. म्हणून भारत देश विकासाकडे वाटचाल करीत आहे. सबका साथ सबका विकास हा नारा देऊन समाजातील तळागाळातील जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. देशाच्या स्वातंत्र्याचा आज अमृत महोत्सव सुरू असून अमृत महोत्सवी वर्षांमध्ये महामहीम द्रौपदी मुरमु यांच्या रूपाने एका आदिवासी महिलेला देशातील राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर विराजमान करणारे देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा 17 सप्टेंबर हा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर गांधी जयंती पर्यंत सेवा पंधरवाडा उपक्रम राबवून सर्वसामान्य जनतेच्या विकासाची व जनतेला सेवा देण्याचा हा उपक्रम सध्या सुरू आहे. देशाचे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त माझ्या हार्दिक शुभकामना...
.
 सौ कल्पनाताई डांगे बनसोडे 
प्रदेश सचिव, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा

Post a Comment

0 Comments