औशा शहरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसच्या परिसरामध्ये पोलिसांची गस्त व पेट्रोलिंग वाढवावी:सौ.प्रियंका लद्दे
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसच्या परिसरामध्ये पोलिसांची गस्त व पेट्रोलिंग वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने औसा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे सध्या चर्चेमध्ये असलेला लहान मुलांना पळवून नेण्याच्या विषयामूळे आपल्या औसा शहरातील विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच बरेचसे कोचिंग क्लासेस शहरापासून दूर असल्यामुळे त्या ठिकाणी एखादा अनूचित प्रकार घडल्यास लवकर निदर्शनास येत नाही,तरी औसा शहरामधील सर्व शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसच्या ठिकाणी गस्त वाढवावी.व अशा सर्व ठिकाणी पेट्रोलिंग देखील वाढवावी.तसेच शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आपण पाठीशी असल्याची खात्री करून द्यावी.जेणेकरून पालक निश्चित व निर्भिडपणे आपल्या पाल्याला शिक्षणासाठी पाठवतील व विद्यार्थी देखील निश्चितपणे शिक्षणाचा लाभ घेतील.या मागणीचे निवेदन दिनांक 25 संप्टेंबर रविवार रोजी औसा पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांना देण्यात आले आहे.यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्ह्याध्यक्षा सौ.प्रियंकाताई शेखर लद्दे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड मुस्तफा इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी पाणीपुरवठा सभापती गोवींद जाधव,गजेश्वर राजे शिंदे यांची उपस्थिती होती.
0 Comments