शेतक-याच्या खरीप अनुदानासाठी मनसेचा आंदोलनाचा इशारा
औसा प्रतिनिधी 
  औसा तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दिलेली ओढ,नंतर संततधार, अतिवृष्टी, हळद्या रोगासह शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव अशी एकापाठोपाठ अनेक अस्मानी संकटे आली आणि शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन,उडीद,मूग ही पिके फस्त झाली.तालुक्यात जवळपास सगळ्याच महसूल मंडळातील शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झालेली असताना प्रशासनाने केवळ ५ महसूल मंडळास गोगलगायीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान झाल्याचे दाखवले असून इतर ३ उजनी, बेलकुंड,मातोळा या महसूल मंडळात गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे प्रचंड नुकसान होऊन सुद्धा पिक विमा धारक शेतकऱ्यांना या नुकसान भरपाई पोटी संभाव्य रकमेच्या २५ टक्के आगावू रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश प्रशासन व सरकारने दिलेले नाहीत.तसेच गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे मिळणाऱ्या अनुदानापासून या भागातील शेतकऱ्यांना वंचित ठेवल्याचे दिसून येत आहे.तेव्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना मदत देत असताना असा दुजाभाव न करता तालुक्यातील सरसकट सर्व मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत देऊन बाधा पोहोचलेल्या सर्व शेतकऱ्यांना तसेच विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगावू रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती सन्माननीय औसा तहसीलदार महोदयांना आज दिनांक २०|९|२०२२ रोजी करण्यात आली.
येत्या चार-पाच दिवसात (सोमवार पर्यंत) प्रशासन व शासनाने याविषयी गांभीर्याने नाही घेतल्यास आणि या लाभापासून वगळलेल्या ३ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिक विमा नाही जाहीर केल्यास येत्या मंगळवारी २७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औसा तहसील कार्यालयाच्या समोर "गळ्याला गळफास लावून घेत" (प्रतीकात्मक)आंदोलन करण्याचा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला.याप्रसंगी मनसेचे लातूर जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे,शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष भागवत शिंदे,तालुका अध्यक्ष मुकेश देशमाने,जिल्हा उपाध्यक्ष सचिन बिराजदार, जिल्हा सचिव धनराज गिरी, विधानसभा संघटक महेश बनसोडे,शहराध्यक्ष प्रवीण कठारे, तालुका संघटक रामप्रसाद दत्त, अमोल थोरात,महादेव गुरुशेट्टी, किशोर आगलावे,गोविंद चव्हाण, सयाजी पाटील,गुणवंत लोहार, शिवली सोसायटीचे सदस्य गोपाळ पाटील,सुधीर चव्हाण, व्यंकटेश पाटील,हनुमंत येणगे, तानाजी गरड,अनिल बिराजदार, समाधान फुटाणे,प्रशांत जोगदंड, धनंजय चिखले,वारकरी परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ म्हेत्रे, गुणवंत लोहार, विशाल उस्तुरे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments