रॉक गणेश मंडळाच्या वतीने माजी सैनिकांना आरतीचा बहुमान 
औसा प्रतिनिधी
 औसा शहरातील रॉक गणेश मंडळांनी यावर्षी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत दररोज सकाळी आणि सायंकाळच्या आरतीसाठी औसा शहर व तालुक्यातील माजी सैनिकांना आरतीसाठी निमंत्रण देऊन माजी सैनिकांचा सन्मान केला आहे. देशाच्या सीमारेषेवर आपल्या प्राणाची बाजी लावून देश रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांना रॉक गणेश मंडळाने यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये आरतीसाठी निमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा मूर्ती स्थापनेच्या ठिकाणी सजावट देखावा केला आहे. रॉक गणेश मंडळ सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन लोकप्रबोधन पर कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृतीचे उपक्रम राबविले आहे. याही वर्षी अत्यंत शिस्तप्रिय व वेळेत विसर्जन करून रॉक गणेश मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून गणेश मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. 51 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदविला. गणेश मंडळाचे मार्गदर्शक तथा माजी नगराध्यक्ष सुरेश अप्पा कारंजे, मंडळाचे अध्यक्ष सागर कारंजे यांनी आरती नंतर दर्शन घेतले. यावेळी पत्रकार राम कांबळे, सौ अश्विनी प्रकाश लातूर, ए शरयू सागर कारंजे, कु आर्या प्रकाश लातूर आणि कनिष्क ा सागर कारंजे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments